Ad will apear here
Next
जेनेट, रामेश्वरी, अभिलाषा ठरल्या ‘दी गॉर्जियस क्वीन ऑफ महाराष्ट्र’
‘दी गॉर्जियस क्वीन ऑफ महाराष्ट्र’स्पर्धेतील विजेत्या (डावीकडून) मनाली देव, श्रुतिका पाटील, जेनेट अग्रवाल, रामेश्वरी वैशंपायन, गीतांजली खैरनार, अभिलाषा जाधव, कनक विसपुते, कृतिका जोगे व डॉ. पल्लवी प्रसाद.

पुणे : व्हाईट डिव्हाईन इव्हेंट्सच्या वतीने आयोजित ‘दी गॉर्जियस क्वीन ऑफ महाराष्ट्र २०१९’ या सौंदर्य स्पर्धेचे विजेतेपद पुण्याच्या जेनेट अग्रवाल (इटर्नल ब्युटी), पुण्याच्या रामेश्वरी वैशंपायन (मिसेस) आणि चाळीसगावच्या अभिलाषा जाधव (मिस) यांनी पटकावले, तर इटर्नल ब्युटी प्रकारात औरंगाबादच्या स्वाती चव्हाण, पुण्याच्या मनाली देव, मिसेस प्रकारात इस्लामपूरच्या स्मिता पाटील, रावेरच्या (जळगाव) श्रुतिका पाटील विजेत्या ठरल्या. मिस प्रकारात पुण्याच्या कनक विसपुते, नागपूरच्या कृतिका जोगे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. जेनेट अग्रवाल ‘ब्युटी विथ कॉज’च्याही मानकरी ठरल्या. स्पर्धेच्या संयोजिका व्हाईट डिव्हाईनच्या संस्थापिका डॉ. पल्लवी प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी सर्व विजेत्या सौंदर्यवती आणि ‘दी गॉर्जिअस क्वीन इंटरनॅशनल’साठी निवड झालेल्या गीतांजली खैरनार उपस्थित होत्या.

डॉ. पल्लवी प्रसाद म्हणाल्या, ‘महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांत ऑडिशन्स आणि प्राथमिक फेऱ्या घेतल्यानंतर अंतिम स्पर्धेसाठी एकूण २३ स्पर्धक निवडण्यात आले होते. यामध्ये मिस, मिसेस आणि इटर्नल ब्युटी या तीन प्रकारात प्रत्येकी तीन स्पर्धक निवडले. ‘डिप्रेशन अवेअरनेस’ ही या स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना होती. या स्पर्धकांनी विविध कौशल्यांचे प्रदर्शन करीत उपस्थितांची मने जिंकली. भविष्यात समाजात तणावमुक्तीसाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून या सौंदर्यवती आपले योगदान देणार आहेत.’

या वेळी अभिनेत्री मेघा धाडे, ग्रुमर चाहत दलाल, दिग्दर्शक केदार गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संतोष चाकणकर आदी उपस्थित होते. कुलदीप बापट यांनी छायाचित्रण, श्वेता केकाळ यांनी मेकअप, तर हिमाली राणे यांनी ड्रेस डिझाइन केले. तरुणींना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी दर वर्षी ‘दी गॉर्जियस क्वीन ऑफ महाराष्ट्र २०१९’ या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. तरुणींमधील कलागुणांना वाव देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. या स्पर्धेच्या माध्यमातून तरुणी आपले कौशल्य आणि सौंदर्य विकसित करून आगामी काळात जाहिरात, चित्रपट आदी क्षेत्रात पाऊल ठेऊ शकतात,’ असे डॉ. पल्लवी प्रसाद यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZQQCG
Similar Posts
खामगावच्या देवयानी हजारे बनल्या ‘मिसेस महाराष्ट्र’ पुणे : खामगाव येथील गृहिणी, उद्योजिका व समाजसेविका असलेल्या देवयानी हजारे यांनी दिवा पेजेंट्स समारोहामध्ये ‘मिसेस महाराष्ट्र-एम्प्रेस ऑफ महाराष्ट्र २०१९’ हा किताब मिळवला. ५० सुंदर व प्रतिभावान स्पर्धकांमधून सुवर्ण विभागात त्यांनी हा सन्मान पटकावला. ‘मिसेस महाराष्ट्र ब्यु‍टी विथ ए पर्पज’च्याही त्या मानकरी ठरल्या
कुटुंबाच्या सहकार्यानेच प्रगतीची शिखरे गाठली; मान्यवर ‘मायलेकीं’चा सूर पुणे : ‘स्त्रीला मुलगी, पत्नी, आई अशा अनेक भूमिकांमधून जावे लागते. त्यामुळे घरून सहकार्य मिळाले नाही, तर बाहेर काही काम करणे शक्य होणार नाही. आम्हाला माहेरून आणि सासरहूनदेखील पाठिंबा मिळाल्याने इथपर्यंत पोहोचू शकलो,’ असा सूर नृत्य, गायन, मेकअप क्षेत्रातील मान्यवर महिलांनी व्यक्त केला. पुण्यातील हिंदू
अर्भकाला जीवनदान देणाऱ्या कचरावेचक महिलांचा सत्कार पुणे : विश्रांतवाडीतील एकतानगरमध्ये कचराकुंडीत टाकलेल्या नवजात मुलीला जीवदान देणाऱ्या लक्ष्मी राजू डेबरे आणि मंगल जाधव या कचरावेचक महिलांचा पुणे महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. या वेळी स्वच्छ संस्थेच्या व येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला
६५व्या वर्षी मॅरेथॉन जिंकणाऱ्या लता भगवान करेंची संघर्षगाथा चित्रपट रूपात पुणे : एखादी सामान्य व्यक्तीही रोजच्या जगण्याचा संघर्ष करत असताना एखादी अफाट कामगिरी करून जाते आणि सारी दुनिया थक्क होते. अशीच एक प्रकाशझोतात आलेली व्यक्ती म्हणजे ६५ व्या वर्षी अनवाणी पायाने धावून बारामतीतील शरद मॅरेथॉन जिंकणाऱ्या लता करे. त्यांच्या आयुष्यावर ‘लता भगवान करे - एक संघर्षगाथा’ हा चित्रपट

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language